(राहुरी प्रतिनिधी) ९ सप्टेंबर : राहुरी पोलिस ठाण्याच्या वतीने आज (दि. ९ सप्टेंबर २०२५) रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नॉन बेलेबल वॉरंटमधील एकूण सात आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. या कारवाईत पकडण्यात आलेले आरोपी असे –
१) गफार गुलाब शेख, मैत्री मळा, राहुरी
२) राहुल गंगाधर कलापुरे, देशवंडी, ता. राहुरी
३) शारदा संदीप तनपुरे, वाघाचा आखाडा, ता. राहुरी
४) अक्षय सुरेश कुलथे, इंगळे इस्टेट, ता. राहुरी
५) जालिंदर आसाराम पाषाण, उबरे, ता. राहुरी
६) अनिल उत्तम सरोदे, कानडगाव, ता. राहुरी
७) रुपेश गोरक्षनाथ लष्करे, वांबोरी, ता. राहुरी
सदर आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आले. यासोबतच जामीन पात्र वॉरंटचीही बजावणी करण्यात आली. नागरिकांना आवाहन
राहुरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या विरुद्ध न्यायालयात प्रकरणे चालू आहेत, त्यांनी समन्स प्राप्त झाल्यानंतर वेळेवर न्यायालयात हजर राहावे. तसे न झाल्यास बेलेबल वॉरंट व त्यानंतर नॉन बेलेबल वॉरंट निघून अटकेची नामुष्की सहन करावी लागू शकते. त्यामुळे नागरिकांनी वेळेत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून स्वतःला अडचणीतून वाचवावे.
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घर्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, एएसआय तुळशीदास गीते, हेडकॉन्स्टेबल विजय नवले, संदीप ठाणगे, सभाजी बडे, बबन राठोड, सतिश आवारे, सुरज गायकवाड, राहुल यादव, हनुमंत आव्हाड, संजय राठोड तसेच पोलीस नाईक देविदास कोकाटे, प्रवीण बागुल, बाबासाहेब शेळके, गणेश सानप आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन ठोबरे, जयदीप बडे, अंकुश भोसले, सागर नवले यांनी ही कारवाई यशस्वी केली.
राहुरी पोलिसांच्या या मोहिमेमुळे पुन्हा एकदा कायद्याचे पालन न करणाऱ्यांना चाप बसला असून, न्यायालयीन कारवाईत विलंब करणाऱ्या आरोपींना धडा शिकविण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.
Leave a reply













