SR 24 NEWS

सामाजिक

भारत सरकारने महान गायक मोहम्मद रफी यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

Spread the love

एसआर 24 न्यूज़ न्यूज नेटवर्क : 24 डिसेंबर 2024 रोजी महान गायक मोहम्मद रफींची 100 वी जयंती निमित्त भारत सरकारने मोहम्मद रफींना भारत रत्न जाहीर करावा.अशी मागणी मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी केली आहे.

यापूर्वीही भारत कवितके यांनी भारत सरकारकडे निवेदन पाठविले आहे.” गरीबों की सुनो,वो तुम्हारी सुनेगा,तुम एक पैसा दोगे,वो दस लाख देगा,” असे कधी भिकाऱ्यांच्या आर्त, दीन, स्वरात, तर कधी,” जानेवालों, जरा होशियार, यहाँ के हम है राजकुमार” असे बेहोश, बेधुंद राजकुमार होऊन गाणारा,तर कधी प्रियेसीला छेडणारा प्रियकराचा आवाज, हृदयातून साद घालून काळीज पिळवटून टाकणारी गजल गाणारा गायक मोहम्मद रफी,तर कधी भक्ती रसाने ओथंबून गाणारा भक्त,कधी रंगतदार पणे कव्वाली गाणारा कव्वाल,अशा विविध भाव भावनांच्या छटांचे सप्तसुरांतून मो.रफींनी पिसारे फुलविले.

मराठीतील ” ळ” या अक्षरांची अनेक अमराठी गायकांनी धास्ती घेतली होती, अनेक अमराठी गायक “ळ” बद्दल तक्रार करीत असत,पण हेच “ळ” मोहम्मद रफींनी आपल्या गाण्यातून सहजपणे उच्चारले आहे, मराठीतील संगीतकार श्रीकांत ठाकरे ( राज ठाकरे यांचे वडील) यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मोहम्मद रफींनी अनेक मराठी गाणी गायली आहेत.” प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा,हसा मुलांनो हसा” हे बालगीत,” अंग पोरी संभाल दर्या ला तुफान आयलय भारी,” हे कोळी गीत,” हे मना आज कोणी बघ तुला साद घाली,” हे भावगीत,” नांदतो देव हा आपुल्या अंतरी “हे भजन,अशी अनेक मराठी गाणी मोहम्मद रफींनी गाऊन अजरामर केली आहेत.अशा महान गायकास मरणोत्तर भारतरत्न द्यावा ही मागणी पत्रकार भारत कवितके यांची आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!