SR 24 NEWS

इतर

मा. प्राजक्तदादा तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरीत अहिल्याभवन येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर, स्रिरोग, कॅन्सर निदान,नेत्र चिकित्सा,योग प्राणायाम आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

Spread the love

(राहुरी प्रतिनिधी) ९ सप्टेंबर राहुरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कार्यरत राहिलेले माजी मंत्री मा. आ. प्राजक्तदादा तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत स्टेशन रोडवरील अहिल्या भवन येथे भव्य मोफत स्त्रीरोग, वंध्यत्व, कॅन्सर निदान, नेत्र चिकित्सा, योग व प्राणायाम शिबिर होणार असल्याची माहिती पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी दिली.

डॉ. माने मेडिकल फाउंडेशन संचलित साईधाम हॉस्पिटल, राहुरी व एस.बी.आय. फाउंडेशन यांच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज एस.बी.आय. कॅन्सर केअर स्क्रीनिंग व्हॅन उपलब्ध राहणार आहे. यामध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधे, सोनोग्राफी, गर्भाशय मुखाचा कॅन्सर तपासणी, स्तनातील गाठींची तपासणी तसेच तोंडाच्या कॅन्सरची तपासणी केली जाणार असून, तपासणीनंतरचे रिपोर्ट त्याच दिवशी देण्यात येणार आहेत. तसेच गरजू रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतर्गत व अल्प दरात शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

याशिवाय, पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केली जाणार आहेत. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग अपेक्षित असून, तपासणीनंतर अल्प दरात चष्म्यांचे वाटपही केले जाणार आहे.

महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी आरोग्यम योग केंद्र यांच्यावतीने सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान व आहार मार्गदर्शनाचे सत्र घेतले जाणार आहेत. प्रशिक्षित महिला योगशिक्षक योजनाताई लोखंडे व मनिषा वासकर यांचे मार्गदर्शन या शिबिरात लाभणार आहे.

राहुरी तालुक्यातील सर्व माता-भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!