जुन्नर प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील ज्येष्ठ नागरिक वै. गं. भा. कमल विष्णूपंत आंबेकर (वय 96 वर्षे) यांचे बुधवार, दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या प्रेमानंद महाराज आंबेकर यांच्या आजी होत.
त्यांचा दशक्रिया विधी दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता निमगाव सावा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे. या निमित्त साधकहृदय रत्न गु. डॉ. नारायण महाराज जाधव यांचे परवचन होणार आहे. स्थानिक समाजात आपुलकीने वागणाऱ्या कमल विष्णूपंत आंबेकर यांच्या निधनाने ग्रामस्थांसह आंबेकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक वै. गं.भा.कमल विष्णूपंत आंबेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

0Share
Leave a reply












