तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शिक्षणमहर्षी सि.ना. आलुरे गुरूजी सेवकांची सहकारी पतसंस्था यांची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. 28 सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणमहर्षी स्व. सि.ना. आलुरे गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे मा. श्री. महादेव आण्णा आलुरे, पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. राजकुमार ठोंबरे, मुख्याध्यापक श्री. गोपाळ कुलकर्णी व उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सभेचे प्रास्ताविक श्री. सिद्धेश्वर मसुते यांनी केले. पतसंस्थेचे सचिव श्री. मकरंद पाटील यांनी श्रद्धांजली सादर करून आर्थिक वर्ष 2024-25 चा सविस्तर अहवाल सादर केला. यामध्ये सध्याचे भांडवल, सभासद गटविमा, भांडवल वाढीसाठीचे प्रयत्न, व्याजदर, संगणकीय प्रणाली यांसह विविध मुद्द्यांवर चर्चासत्र झाले. उपस्थित सभासद, मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेऊन अनेक विषय सर्वानुमते मंजूर केले.
अध्यक्षीय समारोपात श्री. ठोंबरे यांनी सभासदांना मिळणारे लाभ, काटकसरीचा कारभार, विविध कर्जपुरवठा योजना, तसेच आकस्मिक व साध्या कर्जाची तरतूद यांचा आढावा घेऊन संस्थेची भावी प्रगती साधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सप्टेंबर अखेरीस सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक श्री. राजकुमार ठोंबरे सर व श्री. मनोहर घोडके सर यांचा पतसंस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते निरोपादाखल सत्कार करण्यात आला. सभेसाठी सेवानिवृत्त श्री. कैलास बोंगरगे गुरूजी, शिक्षण प्रसारक मंडळ, अणदूर संचलित सर्व शाखांचे मुख्याध्यापक, संचालक व सभासद उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात सभा यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सिद्धेश्वर मसुते यांनी केले.
Leave a reply













