सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : नेवासा तालुक्यातील चांदा येथील सोमेश्वर क्लास प्राथमिक शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. आपल्या आवडत्या शिक्षकांप्रती असलेली आपुलकी आणि स्नेहभावना व्यक्त करताना अनेक विद्यार्थी अश्रू अनावर झाले. विद्यार्थ्यांसोबतच पालक वर्गही या क्षणी भावुक झाला.
सोमेश्वर क्लास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र काटकर व शिक्षक राहुल बोरा यांची नुकतीच बदली झाली. त्यानिमित्ताने शनिवारी शाळेत निरोप समारंभ व नव्याने आलेल्या शिक्षकांचे स्वागत सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रावसाहेब दहातोंडे होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देताना भावनिक वातावरण निर्माण झाले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी अंबाडे यांनी शिक्षकांनी केलेल्या कार्याचा तपशीलवार आढावा घेतला. ज्येष्ठ प्रा. एन.टी. शिदे, श्यामराव पवार, संतोष गाढवे, शहाजी धुमाळ, बाळासाहेब जावळे यांनी आपली मनोगते व्यक्त करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी दिलीप पेहेरे, युवा नेते सागर जावळे, बाळासाहेब गुंदेचा, सुभाष गायकवाड, संजय जावळे सर, किरण दहातोंडे, काका जावळे, प्रमोद दहातोंडे, अरुण विधाटे, अविनाश कोथिंबिरे, अनिल दहातोंडे, विजय थिटे, किरण गायकवाड, राहुल अभंग, जगनाथ थिटे, अतुल गायकवाड, अशोकराव झावरे यांच्यासह पालकवर्ग व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निरोप समारंभामुळे शाळेत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नाते किती घट्ट आहे, याचे दर्शन यावेळी सर्वांना घडले.
चांदा येथील सोमेश्वर क्लास प्राथमिक शाळेतून शिक्षकांची बदली होताच चांदा विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर

0Share
Leave a reply












