तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : प्रतिकूल परिस्थितीशी चार हात करून पाल्यांना नावाप्रमाणेच संस्कार आणि संस्कृती यांना गुणवत्तेचे व सु-संस्काराचे धडे देऊन समाजापुढे पत्रकार लक्ष्मण दुपारगुडे यांनी आदर्श निर्माण केल्याचे गौरव उद्गार प्रा.डॉ. एम बी बिराजदार यांनी व्यक्त केले.बाबळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्था व जय मल्हार पत्रकार संघ यांच्या वतीने कुमारी संस्कृती दुपारगुडे ही तुळजापूर येथील नवोदय विद्यालय प्रवेश पात्र झाल्याने तिचा काळुंखे यांच्या स्वग्रही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत अणदूरकर हे होते.
डी.न्यूज चे संपादक लक्ष्मण दुपारगुडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून पाल्यावर शिक्षणाचे व चांगल्या संस्काराचे धडे देऊन समाजापुढे वेगळा आदर्श प्रेरणादायी असल्याची भावनाही प्रा. बिराजदार यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी श्री श्री गुरुकुल चे मु.आ. लक्ष्मण नरे, शिवशंकर तिरगुले, संजू आलूरे, सचिन तोग्गी, चंद्रकांत हगलगुंडे, पोलीस पाटील जावेद शेख, संस्थेच्या संचालिका अनिता काळुंखे उपस्थित होते.प्रास्ताविक दयानंद काळुंखे तर आभार किरण कांबळे यांनी मांनले.
Leave a reply













