मानोरी (राहुरी) /सोमनाथ वाघ : मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. वैशालीताई उत्तमराव खुळे यांची आज बिनविरोध निवड झाली. ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड यांच्या उपस्थितीत, सरपंच सौ. ताराबाई भिमराज वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.
उपसरपंचपदासाठी वैशालीताई खुळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणुकीची गरजच भासली नाही. सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शवल्याने ही निवड एकमताने झाली.लोकशाही प्रक्रियेचा आदर्श ठरणारी ही निवड गावातील एकात्मतेचे प्रतीक ठरली आहे.या वेळी ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव, कारभारी बर्डे, एकनाथ आढाव, हिराबाई भिंगारे, दिलशाद पठाण, रंजना बाचकर, सुमन आढाव आदी उपस्थित होते. तसेच गावातील जेष्ठ नागरिक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वैशालीताईंचे अभिनंदन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ दगडू पोटे, माजी संचालक निवृत्ती आढाव, माजी चेअरमन भिमराज वाघ, माजी संचालक उत्तमराव आढाव सुनिलभाऊ जाधव, भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव तोडमल, अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन उत्तमराव खुळे, युवा नेते पोपटराव पोटे, बापूसाहेब वाघ, सोसायटीचे चेअरमन शरदराव पोटे, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब दुबे, सामाजिक कार्यकर्ते मनोजभाऊ खुळे, माजी उपसरपंच अण्णासाहेब तोडमल, पोपटराव आढाव सर, माजी उपसरपंच शिवाजी थोरात, पै. संजय डोंगरे, पोपटराव थोरात, राजूभाई पठाण, डॉ. योगेश आढाव, दिनकर आढाव, आदिनाथ गुंजाळ, सागर नेहे, भाऊसाहेब खुळे, सागर भिंगारे, अर्जुन पोटे, मनोज ठुबे, रोहिदास आढाव, योगेश आढाव, आदींचा सहभाग लक्षणीय होता.
महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून उपसरपंचांचे स्वागत केले. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही निवड एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.स्त्रियांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय मानोरीसारख्या ग्रामीण भागात महिलांना राजकीय नेतृत्वाची संधी मिळणे, आणि ती संधी एकमुखी पाठिंब्याने मिळणे, ही घटना गावाच्या प्रगल्भतेचे दर्शन घडवते. उपसरपंचपदी महिलेला एकमताने निवडून देणारा मानोरी गाव लोकशाही आदर्श म्हणून पुढे येत आहे.
वैशालीताई खुळे यांची प्रतिक्रिया
“गावकऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील. मी कोणत्याही पक्ष किंवा गटाच्या पलिकडे जाऊन सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन, पारदर्शक आणि सहभागी कारभार करण्याचा निर्धार केला आहे.”
मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशालीताई खुळे यांची बिनविरोध निवड, लोकशाहीचा आदर्श ठरलेली निवड प्रक्रिया; महिलांच्या नेतृत्वाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा
0Share
Leave a reply












