SR 24 NEWS

इतर

नगर-मनमाड रस्त्याच्या प्रश्नावर कृती समिती आक्रमक; १० सप्टेंबर रोजी राहुरीत रास्ता रोकोचा इशारा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी  / ज्ञानेश्वर सुरशे :  नगर-मनमाड महामार्गावरील दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असून गेल्या आठवडाभरात या मार्गावर झालेल्या अपघातांत ४ निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामुळे संतापलेल्या नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने १० सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कृती समितीच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात रस्त्याच्या कामात गती आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

समितीने खालील मागण्या मांडल्या आहेत

नगर-कोपरगाव मार्गाचे पूर्ण डांबरीकरण करून पेव्हमेंट स्वरूपात तयार करणे, देवळाली नगरपरिषद हद्दीतील साईड गटार भूमिगत करणे, भविष्यातील सर्व्हिस रोड लक्षात घेऊन भूमिगत ड्रेनेजचे नियोजन करणे, सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची माहिती फ्लेक्स बोर्डवर जनतेसाठी जाहीर करणे, रस्ता डांबरीकरण न झाल्यास जड वाहतुकीस बंदी घालून पर्यायी मार्गाने वळविणे.

यावेळी कृती समितीचे वसंत कदम, अनिल येवले, देवेंद्र लांबे, प्रशांत मुसमाडे, आदिनाथ कराळे, बाळासाहेब लोखंडे, दत्ता गागरे, प्रशांत काळे, कांता तनपुरे, प्रतीक तनपुरे, गजानन सातभाई, अनिल कासार, प्रकाश पारख, सतीश घुले, विजय तमनर, कैलास वाघमारे, रमाकांत खडके, राजेंद्र लांडगे, निखिल गोपाळे, गणेश खैरे, अरुण साळवे, सोमनाथ गीते, सुनील पानसंबळ, ज्ञानदेव निमसे, रविंद्र नालकर, विकास साळुंके, आप्पासाहेब मोकळ, निलेश मुंढे, संजय नलावडे, राजेंद्र लोखंडे, सतीश बोरुडे, रमाकांत गीते, विशाल वने, नसीब पठाण, जगू वरखडे, अनिल वाणी, प्रितेश तनपुरे, सचिन चौधरी, विजय भिंगारे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी समितीने ठाम भूमिका घेतली की मागण्या न मानल्यास जनतेच्या जीवितास कारणीभूत ठरणाऱ्या या रस्त्यावरील निष्काळजीपणा विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!