SR 24 NEWS

सामाजिक

राहुरी पोलीस लाईन गणपतीचे टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी  / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस लाईन दत्त मंदिर येथील दत्त मंदिरात पोलीस लाईन येथे राहणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या मुलांनी गणेश स्थापना केली होती सदर गणेशाची दिनांक 3 9 2025 रोजी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढून विसर्जन केले सदरची मिरवणूक आकर्षक ठरली अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे सदर मिरवणुकी करता राहुरी तालुक्यातील 1)संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्था वांबोरी ह भ प किशोर महाराज गडाख 2)ईश्वर महाराज शास्त्री ज्ञानई वारकरी शिक्षण संस्था वांबोरी 3)संत कवी महिपती महाराज वारकरी संस्था ताहाराबाद हभप अर्जुन महाराज तनपुरे 4) विठ्ठल वारकरी संस्था , वांबोरी ह भ प आदिनाथ महाराज दुशिंग वारकरी शिक्षण संस्था उंबरे 5) चैतन्य वारकरी शिक्षण संस्था जोगेश्वरी आखाडा हभप गोपीनाथ महाराज वरपे अशा पाच वारकरी संस्थाचे 200 ते 250 विद्यार्थ्यांचे सहभागात मृदंगाच्या गजरात राहुरी शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती.

सदरची मिरवणूक 4/00 वाजता सुरू होऊन 8/00 वाजता संपली . सदर मिरवणुकीस शहरातील गजानन मित्र मंडळ, व्यंकटेश गणेश मंडळ, बुवा सिंद बाबा मित्रमंडळ , वाल्मिक मित्र मंडळ , छत्रपती तरुण मंडळ , पावन गणेश मंडळ, श्री रामदत्त मित्र मंडळ , गौतम मित्र मंडळ , व्यापारी असोशियन यांनी भेट देऊन चहा – पाणी ,फराळ देत मिरवणुकीचे स्वागत केले . सदर मिरवणुकी करता निमसे पाटील टाकळीमिया यांनी रथ उपलब्ध करून दिला, निवेदक बापू तनपुरे व सुदेश बोरुडे , गणेश वाघ पोपट शिंदे,यांचे विशेष सहकार्य लाभले .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!