राहुरी (प्रतिनिधी सोमनाथ वाघ) : राहुरी पोलीस स्टेशनच्या संकल्पनेतून, राहुरी तालुका कलाकार मंच आणि केअर फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळीवेगळी सांस्कृतिक मैफल “दीपसंध्या शब्दसुर” सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पांडुरंग लॉन्स, स्टेशन रोड, राहुरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात “गाणी, गप्पा, गोष्टी आणि बरंच काही…” अशा विविधरंगी कलात्मक सादरीकरणांचा मनमुराद आनंद उपस्थित प्रेक्षकांना घेता येणार आहे.
राहुरी तालुक्यातील नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागचा हेतू आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे स्नेहालय संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री. गिरीश कुलकर्णी यांच्याशी होणाऱ्या ‘दिलखुलास गप्पा’. त्यांच्या समाजकार्यातील प्रेरणादायी प्रवासाबद्दल, संघर्ष आणि अनुभवांविषयी रसाळ संवादातून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा व सकारात्मक विचार देणारा अनुभव मिळणार आहे.
सदरील कार्यक्रम हा सांस्कृतिक आणि सामाजिक संदेशाचा भाग म्हणून “ऑपरेशन मुस्कान पार्ट-2 – शब्दसूर” या थीमवर आधारित आहे.
शब्द : तालुक्यातील कोणत्याही मुलीचे अपहरण होऊ नये यासाठी डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांचे संदेश.
सूर : दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राहुरी तालुका कलाकारांचा सृजनशील सादरीकरण.
सदरील कार्यक्रम हा राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आला असून, राहुरी तालुका कलाकार मंच आणि केअर फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे.
आयोजकांनी नागरिकांना आणि स्थानिक कलावंतांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवोदित कलाकारांच्या कलेस दाद देण्याचे आवाहन केले आहे.
राहुरीत २० ऑक्टोबरला ‘दीपसंध्या शब्दसुर’ सांस्कृतिक मैफलीचे आयोजन, राहुरी पोलीस स्टेशन आणि केअर संस्थेचा उपक्रम

0Share
Leave a reply













