राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील कनगर गावाच्या शिवारातून पोकलॅन्ड मशीनचे लोखंडी मोठे बकेट चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी प्रदीप अरुण पवार (वय ३०, व्यवसाय : कॉन्ट्रॅक्टर, रा. निमज, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्या मालकीचे अंदाजे २ लाख रुपये किमतीचे पोकलॅन्ड मशीनचे लोखंडी मोठे बकेट कनगर गावच्या शिवारात ठेवण्यात आले होते. दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीची संमती नसताना लबाडीच्या इराद्याने ते बकेट चोरी करून नेले.
सदर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३/२०२६ अन्वये बीएनएस २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दि. १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.५६ वाजता नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बागुल करीत आहेत.
Leave a reply













