SR 24 NEWS

सामाजिक

विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्यु. कॉलेज आणि आय.टी.आय येथे ७९ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा.

Spread the love

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. मारुतराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बापूराव थोरात सर संस्थेचे सचिव मा. श्री. विजयभैय्या थोरात, खजिनदार मा. श्री. संतोष थोरात, सदस्य अजय थोरात , सदस्या सौ. सुशीलाताई थोरात सौ.संगीतताई थोरात तसेच संस्थेच्या प्राचार्य सौ. वंदना थोरात मॅडम व आय टी आय चे प्राचार्य मोहिते सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर भिगवण ग्रामपंचायत सरपंच श्री . गुरापा गंगाराम पवार यांच्या उपस्थितीत परेड संचालन करण्यात आले. तसेच या दिवशी स्कूलमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन या विषयावर भाषण केले. देशभक्तीपर गीत गायन केली. मुलींनी नृत्य सादर केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी कवायत केली.

स्वातंत्र्य दिनासाठी भिगवण गावचे पदाधिकारी, अधिकारी ,ग्रामस्थ , पालकांनी उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भाट सर यांनी केले. तर आभार श्री .भोसले सर यांनी मानले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचे सांगता केली. स्वातंत्र्य दिनाचा उत्सव यशस्वी होण्यासाठी संस्थेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अशा पद्धतीने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!