मानोरी (राहुरी) / सोमनाथ वाघ : स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने मानोरी गाव देशभक्तीच्या उत्साहात न्हाऊन निघाले. ग्रामपंचायत, शाळा, सहकारी संस्था आणि सामाजिक संघटनांत तिरंग्याला मानवंदना देत ध्वजारोहण सोहळे पार पडले. देशभक्तीपर गाणी, विद्यार्थ्यांची कलात्मक सादरीकरणे आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन मानोरीकरांसाठी अविस्मरणीय ठरला.
ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य एकनाथ आढाव यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकनियुक्त सरपंच ताराबाई वाघ, उपसरपंच हिराबाई भिंगारे, सदस्य शामराव आढाव, नानासाहेब आढाव, दादासाहेब आढाव, कारभारी बर्डे, दिलशाद पठाण, अलका भिंगारे, वैशाली खुळे, सुमन आढाव, रंजना बाचकर तसेच ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड, सागर भिंगारे, योगेश आढाव, रोहिदास आढाव, रमेश जाधव, सुखदेव जाधव उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानोरी येथे उपसरपंच हिराबाई भिंगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. मुख्याध्यापक संजय पाखरे, शिक्षिका पुनम क्षीरसागर, विठाबाई शेटे, ज्योती भोगे आणि कलावती जासूद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा उत्साह द्विगुणित केला.
मानोरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत चेअरमन शरदराव पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संचालक भास्कर भिंगारे, डॉ. राजेंद्र पोटे, नवनाथ थोरात, रायभान आढाव, देविदास वाघ, सोहबराव बाचकर, गोरक्षनाथ खुळे, रावसाहेब चुरभारे, बाबादेव काळे, गरुड भाऊसाहेब, काळे भाऊसाहेब, ज्ञानदेव शेळके, चंद्रकांत पोटे उपस्थित होते.
अंबिका माध्यमिक विद्यालयात डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी माजी संचालक गोकुळदास आढाव, उपसभापती रविंद्र आढाव, युवा नेते बापूसाहेब वाघ, सामाजिक कार्यकर्ते मनोजभाऊ खुळे, माजी चेअरमन नवनाथ थोरात, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आढाव, संचालक बाळासाहेब पोटे, संजय पवार, उत्तमराव आढाव, पिरखाभाई पठाण, संभुगिरी महाराज गोसावी, अशोक कोहकडे, कचरूभाऊ आढाव, पोपटराव आढाव सर, चंद्रभान आढाव, प्रकाश चौथे, पोलीसपाटील भाऊराव आढाव, गणेश खुळे, हरिभाऊ आढाव यांसह मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयातील कार्यक्रम मुख्याध्यापक प्रकाश तारडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. शिक्षक गणेश म्हसे, प्रकाश तांबे, अशोक काळे, गोरक्षनाथ घुमे, शिवनाथ डमाळे, बाबासाहेब विधाटे, ऋषिकेश लांबे, मच्छिंद्र शिरसाट, गोपाळे भाऊसाहेब, सुभाष कोकाटे, तसेच वाकचौरे मॅडम, तावरे मॅडम, काळे मॅडम, बर्डे मॅडम, खोबरे मॅडम यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
प्रत्येक ठिकाणी तिरंग्याला वंदन करताना देशभक्तीपर गाणी, वीरांचा गौरव आणि शासकीय परिपत्रकानुसार संगीत कवायत सादर करण्यात आली. सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. रस्ते, शाळा आणि मैदाने देशप्रेमाच्या रंगांनी उजळली. महिला, युवक आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मानोरीचा स्वातंत्र्यदिन खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला.
Leave a reply













