(महाराष्ट्र विशेष ): हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP ) बसवण्यासाठी अखेर मुदतवाढ देण्यात आली असून, आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र 1 डिसेंबर पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. आता वाहनधारकांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची सवलत मिळाली असली तरी, ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट संकेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले आहेत.
सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी HSRP बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक वाहनधारकांनी अद्याप या नियमाची पूर्तता केलेली नाही. वाहनधारकांची ही उदासीनता आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता, शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली असून 30 तारीख ही चौथी वेळ मुदतवाढ राहणार आहे. यानंतर मात्र मुदतवाढ मिळणार नसून 1 डिसेंबर पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असेही विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
वाहनधारकांना अखेर मोठा दिलासा…, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्यासाठी अखेर मुदतवाढ

0Share
Leave a reply












