प्रतिनिधी / आर.आर.जाधव : राहुरी तालुक्यातील वरवंडी (खडकवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा संघटक सहसचिव व ज्येष्ठ पत्रकार आर. आर. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण भोसले यांच्या मार्गदर्शना खाली राहुरी तालुक्यातील युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्यावतीने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोक मंडलीक, तालूका उपाध्यक्ष रमेश खेमनर, तालुका संघटक जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते गणेश सोळसे यांच्यासह ग्रामस्थ शिवाजी शिंगाडे, राजू शिंगाडे, बिराजी गडधे, केशव ऐनर, सोपान बाचकर, लहानु कोळेकर, दामु बर्डे, सागर नाडे, सुभाष शिंगाडे यांच्यासह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावूनही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. चिमुकल्यांच्या भाषणांसह रमेश खेमनर, बालमभाई शेख व दीपक गडधे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती राऊत मॅडम आणि शेख मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री. राऊत सर यांनी केले.
वरवंडी (खडकवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0Share
Leave a reply












