SR 24 NEWS

राजकीय

सरसकट पंचनामे करा ; आमदार दाते यांचे कृषिमंत्री भरणे यांच्याकडे मागणी

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : अतिवृष्टीमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिकं पडली, वाहून गेली आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर आमदार काशिनाथ दाते यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र देत शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

आमदार दाते यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभाग पंचनामे करत आहेत. मात्र, शेतकर्‍यांना वेळेवर दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे तातडीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.याच पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पारनेर तालुयातील नुकसानीची पाहणी केली. शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी बोलताना मंत्री भरणे म्हणाले, शेतकर्‍यांच्या आयुष्यभराच्या स्वप्नांचे या पावसात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. पंचनामे पूर्ण होताच मदत निधीचा शासन निर्णय त्वरीत जाहीर होईल.

या पाहणीवेळी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा सोनाबाई चौधरी, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, भाजप सरचिटणीस सागर मैड, जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार, उद्योजक मंगेश दाते, शिवसेना उपतालुकाप्रमुख अजिंय दरेकर, सरपंच मनोज मुंगशे, गणेश शेळके आदी पदाधिकार्‍यांसह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!