तुळजापूर, प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) – राष्ट्रीय महामार्गावरील चिवरी पाटीवरील भुजबळ वस्तीतील पन्नासहून अधिक घरे अतिवृष्टीमुळे पाण्याखाली आडलेली आहेत. या आपतग्रस्त कुटुंबांसाठी तातडीने मदत देण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली. त्यांनी इशारा दिला की, पाण्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा तातडीने तोडगा काढला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
आज, शुक्रवार सायंकाळी पाच वाजता, मधुकर चव्हाण यांनी या वस्तीचा दौरा केला आणि तेथील परिस्थिती पाहतांना माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील चुकीचे व निकृष्ट काम वस्तीतील कुटुंबांसाठी गंभीर फटका ठरले असून अनेक कुटुंब उघड्यावर राहिले आहेत.
मधुकर चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वस्तीतील पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांनी चिवरी पाटील ते लोहार गल्ली येथील 30 वर्षांपूर्वी बांधलेल्या पूलाची पाहणी केली आणि पुनर्बांधणीसाठी तातडीचे आदेश दिले.
या दौऱ्यात वस्तीतील अनेक महिलांनी महामार्गावरील रस्त्याचे पाणी घरात घुसल्यामुळे कुटुंबांचे तीन ते चार दिवस चालणाऱ्या समस्यांचे तोंड देण्याची माहिती दिली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय माशाळे, तलाठी गायकवाड, मनोज मुळे, किशन पांचाळ, सुरेश पवार, वसंत नन्नवरे, मुकुंद पांचाळ, लिंबाजी जाधव, बाबुराव भुरे, पांडू जाधव, रामेश्वर कबाडे, निर्मला पांचाळ, सुरेखा पवार, नीता जाधव, संतोष चव्हाण, आप्पा कदम, पंढरी मातोळकर, उमाकांत गायकवाड, नवनाथ दुधाळकर, राम शिंदे, फुलचंद साळुंखे, रोहित भुजबळ आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.मधुकर चव्हाण यांनी वस्तीतील कुटुंबांना धीर देत शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले
अतिवृष्टीने फटका बसलेले पन्नासहून अधिक घर; माजी मंत्री मधुकर चव्हाणांची तातडीने मदत देण्याची मागणी

0Share
Leave a reply












