राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : गोटुंबे आखाडा, राहुरी येथील अल्पवयीन मुलगी ही घरच्यांवर रागावून घर सोडून गेल्याने ती बेपत्ता झाली होती. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी केलेल्या चोख तपासामुळे मुलगी सुरक्षितरीत्या सापडून तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सोपविण्यात आली आहे. दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी तीन वाजता फिर्यादी यांची मुलगी “किराणा दुकानातून चॉकलेट आणते” असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती परत न आल्याने मुलीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करून राहुरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दरम्यान तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर मुलगी राहुरी येथे येणार आहे. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथक रवाना झाले व दि. २४ सप्टेंबर रोजी राहुरी शहरातून मुलगी सुरक्षितरीत्या मिळून आल्याने तिला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई मा. सोमनाथ घारगे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), मा. सोमनाथ वाघचौरे (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर), मा. जयदत्त भवर (उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय आर. ठेंगे (राहुरी पोलीस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोसई गणेश वाघमारे, पोहेकॉ राहुल यादव, पोहवा दारकुंडे, पोकॉ इफ्तेखार सय्यद, शिरसाठ तसेच मोबाईल सेल श्रीरामपूरचे पोना. सचिन धनाड व पोना. संतोष दरेकर यांनी केली केली.
सदर गुन्ह्याचा तपास पोसई गणेश वाघमारे व रायटर पोकॉ इफ्तेखार सय्यद हे करीत आहेत.नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की या गुन्ह्याबाबत किंवा इतर कोणतीही माहिती असल्यास पोनि. संजय ठेंगे (राहुरी पोलीस स्टेशन) यांच्याशी 8788891147 या क्रमांकावर संपर्क साधावा.
गोटुंबे आखाडा येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा राहुरी पोलिसांनी लावला शोध, मुलीस ताब्यात घेत केले पालकांच्या स्वाधीन, मागील दीड वर्षात एकूण 89 अल्पवयीन अपहरित मुलींचा शोध

0Share
Leave a reply












