राहुरी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर,कराळेवाडी, कामगार वसाहत भागात डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून,आज या भागातील नागरिकांनी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कराळेवाडी परिसरातून निघणाऱ्या नाल्याचे सांडपाणी हे मोकळ्या जागेत सोडले जात असून त्यामुळे परिसरात साचलेली घाण आणि दलदल यामुळे परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे.ही परिस्थिती गंभीर असून त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
येत्या सात दिवसांत डुकरांचा आणि सांडपाण्याचा योग्य बंदोबस्त न झाल्यास,परिसरातील नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.या प्रसंगी अंबिकानगर मित्र मंडळाचे रमेश मोरे,अनिल येवले सर,रोहित काळे,सचिन जाधव,दीपक कांबळे,आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
राहुरी फॅक्टरीत डुकरांचा तीव्र उपद्रव ; नागरिकांचा संताप..!, सात दिवसांत बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा

0Share
Leave a reply












