अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अणदूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक कोरे हरीओम सुधीर (बी.एस्सी. द्वितीय वर्ष) यांची सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरी, बांधिलकी, राष्ट्रीय सेवा योजनेबद्दलची आस्था व समाजसेवेतील अनुभवाची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सन २०२५–२६ व २०२६–२७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी माननीय कुलगुरू महोदयांनी जाहीर केली आहे.
या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, अणदूरचे सचिव मा. श्री. रामचंद्र (दादा) आलुरे, ॲड. लक्ष्मीकांत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, डॉ. अंकुश कदम, जिल्हा समन्वयक डॉ. बाळासाहेब मैंद, कार्यक्रमाधिकारी डॉ. सूर्यकांत आगलावे, डॉ. दयानंद कांबळे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हरीओम कोरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
जवाहर महाविद्यालयाच्या हरीओम कोरे यांची विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीवर नियुक्ती

0Share
Leave a reply












