विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर (वसंत रांधवण) : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा खिलारी यांनी टाकळी ढोकेश्वर गणातून उमेदवारी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या खासदार निलेश लंके समर्थकांच्या बैठकीत खिलारी यांच्या नावाची उमेदवारीसाठी एकमुखी मागणी कायकर्त्यांनी केली. या बैठकीत टाकळी ढोकेश्वर गणामधील गावातील अनेक युवा कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान खासदार निलेश लंके यांचे कट्टर खंदे समर्थक निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांशी समन्वय साधून वरिष्ठांनी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून टाकळी ढोकेश्वर गणातून निवडणुकीसाठी तयारी दर्शवली असून, त्यांनी आपल्या पत्नी सरपंच अरुणा खिलारी यांना उभे करणार असल्याचे स्पष्ट केले. गणातील प्रलंबीत विकासकामे मार्गी लावण्यासाठी व जनतेच्या सेवेसाठी आपल्या ताकदीने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच अरुणा खिलारी ३० वर्षांपासून टाकळी ढोकेश्वर गावात अनेक विकासात्मक कामांची पायाभरणी करून पार पाडली आहेत. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून करोना महामारीच्या काळात बाळासाहेब खिलारी यांनी खासदार निलेश लंके यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्यांच्या नेतृत्वशैलीमुळे स्थानिक पातळीवर मजबूत जनसंपर्काचे जाळे निर्माण झाले आहे. बाळासाहेब खिलारी यांचा सर्वच घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांशी लोकसंपर्क, राजकीय कसब आणि समाजातील सर्व स्तरात असलेली चांगली प्रतिमा पाहता विकासात्मक कामातून त्यांनी स्थानिकांमध्ये विशेष विश्वास निर्माण केला आहे.
बाळासाहेब खिलारी हे खासदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी असून लंंके परिवाराशी असलेल्या घट्ट नात्यामुळे आणि एकनिष्ठ कार्यशैलीमुळे त्यांचा प्रभाव केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण टाकळी ढोकेश्वर गटात वाढला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक कार्याचा वारसा असून, तरुण कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद, संघटनात्मक कौशल्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या उमेदवारीला टाकळी ढोकेश्वर गटातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पार पडलेल्या समर्थकांच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी टाकळी ढोकेश्वर गटात परिवर्तनासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे,असे मत मांडले. या पार्श्वभूमीवर अरुणा खिलारी यांच्या नावाची उमेदवारीसाठी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली असून त्यांनी या आव्हानासाठी तयारी दर्शवली आहे.
बैठकीत अरुणा खिलारी यांना टाकळी ढोकेश्वर गणातील भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल, ढोकी, टाकळी ढोकेश्वर,वासुंदे, वडगाव सावताळ,गाजदीपूर,खडकवाडी, मांडवे खुर्द, देसवडे या गावातील आजी -माजी सरपंच, सदस्य चेअरमन संचालक यांचा खंबीर पाठिंबा दिला असून सरपंच अरुणा खिलारी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांशी समन्वय साधून जागावाटपाची चर्चा झाली आहे. वरिष्ठांनी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने टाकळी ढोकेश्वर गणाची जागा लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांनीही याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे अरुणा खिलारी यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सभापतीपद महिलेला असल्यामुळे खिलारी यांना गटामधील गावातील व वरिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की,खिलारी यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. सध्या अरुणा खिलारी या टाकळी ढोकेश्वर गणातील जनसंपर्क मोहीमील गती देत आहेत. स्थानिक महिला, युवक आणि विविध सामाजिक घटकांशी गाठीभेटी, संवाद व कार्यकर्त्यांशी बैठकांचे सत्र सुरू झाले असून स्थानिक नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
टाकळीढोकेश्वर गणातून अरुणा खिलारी यांची राहणार उमेदवारी!,अरुणा खिलारी यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा,कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी

0Share
Leave a reply












