श्रीरामपूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जनरलिस्ट पत्रकारिता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. संगमनेर येथील मालपाणी कॉलेज अंतर्गत डॉ. संतोष खेडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली होती.या परीक्षेत ग्रामीण पत्रकारितेत कार्यरत असलेले व रुद्रा न्यूज डिजिटल मीडियाचे संपादक नारायण चोरमले (राहुरी/श्रीरामपूर) व किरण जाधव (नेवासा) यांनी यशस्वी कामगिरी केली असून ते दोघेही उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचे कार्य रुद्रा न्यूजकडून सातत्याने होत असून, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक भान जपणाऱ्या या दोघांनी पत्रकारिता डिप्लोमा पूर्ण करून आपले कार्य अधिक समर्पकपणे पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.या घडामोडीमुळे ग्रामीण पत्रकारितेला नवचैतन्य मिळाले असून, अशा उगमस्थानी काम करणाऱ्या पत्रकारांचे यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Leave a reply













