राहता ता पतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : लोणी दाढ बु. येथे हिंदू मातंग समाजाच्या बांधवावर झालेल्या जिहादी मानसिकतेच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. दाढ बु. (ता. राहता, जि.अहिल्यानगर) येथे हिंदू मातंग समाजातील कुटुंबावर काही जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले. पीडित कुटुंबाला कायदेशीर व सामाजिक आधार देण्यासाठी बजरंग दल प्रतिनिधी आणि मातंग समाज बांधव एकत्र आले होते.
सर्व उपस्थितांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. पीडित कुटुंबाला सुरक्षा द्यावी आणि ग्रामशांततेस बाधा आणणाऱ्यांना रोखावे,हॉटेल आलम जमीनदस्त करण्यात यावे अशी मागणी केली.
या घटनेविरोधात बजरंग दल पूर्ण ताकतीने पिडीत हिंदू मातंग समाजाच्या पाठीशी असून अन्याय सहन केला जाणार नाही. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन केले जाईल,असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपस्थित भारतीय दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्ष हिना उबाळे, बजरंग दलाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत घोगरे, बजरंग दल लोणी अध्यक्ष सागर राक्षे सामाजिक कार्यकर्ते: विकी राक्षे, विशाल आव्हाड, संकेत तांबे, अमन शेख, विठ्ठल भाऊ ठोंबरे, सागर उबाळे, मनोज साळवे, गणेश साळवे, शुभम साळवे, अभिषेक वीर, संदीप साळवे, प्रकाश जाधव, आकाश साळवे, राजेंद्र साळवे, संदीप कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
त्याचबरोबर हिंदू समाजावर हल्ला म्हणजे आमच्यावर हल्ला आहे, असे प्रतिपादन बजरंग दल संपर्क प्रमुख प्रशांत घोगरे, सागर राक्षे यांनी केले.हे सहन केले जाणार नाही असे वक्तव्य यावेळी करण्यात आले.
दाढ बु हिंदू मातंग समाजावर झालेल्या हल्याचा भारतीय दलित महासंघ ; विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध

0Share
Leave a reply












