SR 24 NEWS

क्राईम

विशेष पथकाचा शेवगावाच्या कुंटणखान्यावर छापा ; १७ महिलांची केली सुटका

Spread the love

एसआर 24 न्यूज़ प्रतिनिधी / मोहन शेगर : शेवगावमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकून १७ पीडित महिलांची सुटका केली आहे. याबाबत चार जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ग्राहक बनून छापा टाकण्यात आला असता पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (ता.१७) रात्री दहा वाजता केली. शबाना सय्यद पठाण, गणेश शिंदे, गणेश अंबादास पाचे, राहुल अरुण गर्जे (सर्व रा. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

विशेष पोलीस पथकातील पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव शहरातील शिवनगर परिसरात अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक बनून छापा टाकला. या कारवाई १७ पीडित महिलांची सुटका करण्यात असून पोलीस गीतांजली विजय पाथरकर यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुंदरडे, महिला पोलीस कल्पना गावडे, प्रियांका हरिदास निजावे, सविता शिंदे, राहुल आठरे, भरत अंगरखे, राहुल गुंजाळ, दिनेश मोरे, शंकर चौधरी, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, अक्षय भोसले, सुनील पवार यांच्या पथकाने कारवाई केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!