राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मालपाणी विद्यालय, संगमनेर येथे इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेणारी कु. पावबाके जान्हवी कैलास हिने शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदवले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण विद्यालयाचा गौरव वाढला आहे. जान्हवी ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असलेले कृषि सहाय्यक श्री. कैलास पावबाके व सौ. मनिषा पावबाके यांची कन्या आहे.या घवघवीत यशाबद्दल कु. जान्हवीचे, तिच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
यामध्ये विशेषतः मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती आरणे मॅडम यांचे योगदान उल्लेखनीय आहे. संस्थेच्या चेअरमन मा. सुवर्णाताई मालपाणी, सेक्रेटरी मा. सतीश लाहोटी, मुख्याध्यापक मा. हापसे सर, तसेच पर्यवेक्षक मा. थोरात सर यांनी देखील जान्हवीच्या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जान्हवीच्या या यशामुळे मालपाणी विद्यालयाने आणखी एक शैक्षणिक शिखर गाठले असून, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Homeशिक्षण विषयीराहुरीची जान्हवी पावबाके शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत उज्वल यश
राहुरीची जान्हवी पावबाके शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत उज्वल यश

0Share
Leave a reply












