SR 24 NEWS

इतर

देवळाली प्रवरात उद्या १ जानेवारीपासून साई नामाचा गजर,श्री साई प्रतिष्ठान आयोजित साई उत्सव तपपूर्ती सोहळा प्रख्यात कीर्तनकारांची कीर्तने

Spread the love

देवळाली प्रवरा  : देवळाली प्रवरात येथील श्री साई प्रतिष्ठाणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे गुरुवार दिनांक १ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ११ वर्षापासून श्री साई प्रतिष्ठान देवळाली प्रवरा व देवळाली ग्रामस्थांच्यावतीने महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली साई पारायण व कीर्तन महोत्सवचे आयोजन करण्यात येते. यंदाचे १२ वे वर्ष तथा तपपूर्ती साई उत्सवास १ जानेवारी रोजी प्रारंभ होणार असून सांगता ८ जानेवारी रोजी होणार आहे.

गुरुवार १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता कलश पूजन व ग्रंथ पूजन होईल. त्यानंतर पारायण वाचनास सुरुवात होणार आहे. या या उत्सवानिमित्त सकाळी ४.३० वा, काकड आरती, सकाळी ८ ते १२ साई सच्चरित्र पारायण ,माध्यन्ह आरती ,सायंकाळी ४ वाजता हरिपाठ , सायंकाळी ६ वाजता धूप आरती व त्यानंतर ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कीर्तन, शेज आरती व नंतर महाप्रसाद होईल. पारायण व्यासपीठ चालक गणेश महाराज मुसमाडे हे आहेत.उत्सवाच्या काळात हजारो भाविकांसाठी सकाळी नाश्ता तर दुपार व रात्री महाप्रसादाचे अन्नदात्यांच्या सहकार्याने आयोजन केले आहे

कीर्तन महोत्सवानिमित्त ०१ जानेवारीला भागवत महाराज उंबरेकर, ०२ जानेवारी रोजी कान्होबा महाराज देहूकर(पंढरपूर), ३ जानेवारीला उल्हास महाराज सूर्यवंशी, ४ जानेवारी उमेश महाराज दशरथे, ५ जानेवारी रोजी एकनाथ महाराज चत्तर, ६ जानेवारीला युवराज महाराज देशमुख, ७ जानेवारी रोजी ज्ञानेश्वर महाराज शिंदे (माऊली) यांची किर्तनसेवा संपन्न होणार आहे.८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर भव्य महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.

तरी या पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी पारायण वाचनास बसावे त्यासाठी ग्रंथ उपलब्ध करून दिले जातील असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!