SR 24 NEWS

राजकीय

तमनर आखाडा सोसायटीच्या चेअरमनपदी गंगाधर तमनर, व्हाइस चेअरमनपदी गणपत तमनर यांची बिनविरोध निवड

Spread the love

 प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवड प्रक्रिया शनिवार, दि. 27 डिसेंबर रोजी तमनर आखाडा येथे शांततेत व उत्साहात पार पडली. या निवड प्रक्रियेत सोसायटीच्या चेअरमनपदी गंगाधर तमनर तर व्हाइस चेअरमनपदी गणपत तमनर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

चेअरमन पदासाठी गंगाधर तमनर यांचे नाव सूचक देवका झुगा तमनर यांनी सुचविले असून अनुमोदक म्हणून भाऊसाहेब गजानन तमनर होते. तर व्हाइस चेअरमन पदासाठी लक्ष्मण तुकाराम तमनर यांनी सूचक म्हणून प्रस्ताव मांडला असून अशोक सिताराम तमनर यांनी त्यास अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी इतर कोणतेही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंगाधर तमनर व गणपत तमनर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

या निवड प्रक्रियेवेळी सोसायटीचे एकूण अकरा संचालक सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचे माजी खासदार प्रसादराव तनपुरे, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे, माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे तसेच युवा नेते हर्षदादा तनपुरे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित चेअरमन गंगाधर तमनर यांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, प्रामाणिक व सहकारभावनेतून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!