राहुरी फॅक्टरी : राहुरी तालुक्यातील प्रसादनगर येथे उद्या गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी ऋषीपंचमी निमित्त श्री.मच्छिंद्रनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय नवनाथ सेवेकरी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य अमोल महाराज साळवे यांनी दिली आहे. अखिल भारतीय नवनाथ सेवेकरी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य अमोल महाराज साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी श्री.मच्छिंद्रनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो.सालाबाद प्रमाणे या ही वर्षी गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसाद व रात्री ९ वाजता नाथगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय नवनाथ सेवेकरी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य अमोल महाराज साळवे यांच्यासह विशाल बर्डे,बंटी लोंढे,अनिल पवार,गोरख नरोडे,दादा ठोंबरे,सचिन अरंगळे,किरण दुस, विलास खर्डे,अक्षय साळुंके,सुनील जाधव,दत्ता पाटील,संदीप सौदागर,पवन वैरागर,अमोल कोळसे,सागर सोनवणे आदींनी केले आहे.
Leave a reply













