राहुरी वेब प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील जांभुळबन येथील भाऊसाहेब विठ्ठल बाचकर याची, गंगापूर येथील प्रियसी जयश्री चव्हाण हिने प्रियकराने सोबत राहण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे, शिवप्रभा ट्रस्टमध्ये १२ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.घारगाव पोलिसांनी केवळ काही दिवसांत या हत्येचा तपास लावून आरोपी प्रेयसीला अटक केली आहे.
१२ ऑक्टोबर रोजी शिवप्रभा ट्रस्ट परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख भाऊसाहेब बाचकर (रा. जांभुळबन, ता. राहुरी) अशी पटली. त्याचे जयश्री काकासाहेब चव्हाण (रा. काटेपिंपळगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हिच्याशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही काही काळ अहिल्यानगर येथे एकत्र राहत होते.
११ ऑक्टोबर रोजी भाऊसाहेब पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी साकूर येथे आला असता, त्याच्यासोबत जयश्री देखील होती. त्यावेळी भाऊसाहेबने पत्नीसमोर स्पष्ट केले की, त्याला आता जयश्रीसोबत राहायचे नाही आणि तो पुन्हा आपल्या कुटुंबासोबत राहणार आहे. याचा राग आल्याने जयश्रीने “तुम्हाला माझ्यासोबत राहावेच लागेल, नाहीतर जीवे ठार मारेन” अशी धमकी दिली. त्यानंतर तिने भाऊसाहेबला मोटारसायकलवरून शिवप्रभा ट्रस्ट येथे नेऊन, टणक हत्याराने डोक्यावर वार करून त्याचा खून केला आणि तेथून पसार झाली.
घारगाव पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, पोकॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, महिला पोकॉ. अमृता नेहरकर यांच्या पथकाने तपासाच्या दरम्यान जयश्रीने तिच्या पतीला फोन करून नेवासा फाटा येथे बोलावल्याचे उघडकीस आणले. पोलिसांनी तेथे पोहोचून जयश्रीला ताब्यात घेतले असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या पथकाने केली.
प्रियकरासोबत राहण्यास नकार दिल्याचा राग — प्रेयसीकडून निर्घृण खून!, राहुरी तालुक्यातील जांभुळबन येथील भाऊसाहेब बाचकर याचा संगमनेर येथे खून; घारगाव पोलिसांचा गुन्हा उलगडा

0Share
Leave a reply












