SR 24 NEWS

अपघात

राहुरी -शनीशिंगणापूर रस्त्यावर तीन बिबटे एकत्र रस्ता ओलांडताना अपघात ; अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी – शनिशिंगणापूर रस्त्यावरील उंबरे शिवारातील बारहाते वस्ती नजीक शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. तीन बिबटे एकत्र रस्ता ओलांडत असताना त्यातील एका बिबट्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची जोरदार धडक बसली. या धडकेमुळे सदर बिबट्या गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

घटनास्थळी सापडलेल्या पायाचे ठसे आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाचवेळी तीन बिबटे रस्ता ओलांडत होते. मात्र, अचानक आलेल्या वाहनामुळे एक बिबट्या त्यात सापडून गेला. अपघात घडविणारे वाहन घटनास्थळावर न थांबता पुढे गेले असल्याने वाहन व चालक याची माहिती मिळू शकलेली नाही.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!