SR 24 NEWS

क्राईम

राहुरी खुर्दमध्ये गुटखा-मावा विक्रेत्या दुकानावर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचा छापा ; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (26 जुलै) : अवैध गुटखा व मावा उत्पादन करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज शनिवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स या किराणा दुकानावर छापा टाकून केली. यावेळी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून या कारवाईने परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

विशेष पोलीस पथकाने पवन ट्रेडर्समध्ये छापा टाकल्यावर मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशीन, सुपारी, मावा, विमल व गोवा पानमसाला यांसह एकूण सुमारे ५.५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणात पवण उर्फ पृथ्वीराज दगडुसिंग गिरासे (रा. राहुरी खुर्द) याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारनंतर सुरू होते.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहे, कर्मचारी दिगंबर कारखिले, सुनील पवार, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, दिनेश मोरे, अजय साठे, अमोल कांबळे, दीपक जाधव यांच्या पथकाने केली. या धाडीतून पोलिसांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा ठोस संदेश दिला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सदरील कारवाईचे परिसतील नागरिकांकडून  कौतुक केले जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!