राहुरी वेब प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर सूरशे) : समाजहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण, निःस्वार्थ आणि प्रभावी कार्याची दखल घेत ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय गौरव समारंभात राहुरी (जि. अहिल्यानगर) येथील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. योगेश गोरक्षनाथ करपे यांना “राज्यस्तरीय समाजसेवा सन्मानपत्र” प्रदान करण्यात आले.
योगेश करपे हे ज्ञानमाता सेवाभावी संस्था (NGO) संचलित माहिती अधिकार नागरिक समूह या संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वंचित घटकांच्या हक्कांसाठी केलेले सततचे प्रयत्न, तसेच शिक्षण, कायदा, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, जनजागृती आणि लोकजागरण या क्षेत्रांतील उपक्रमांतून समाजातील बदलासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
हा मानाचा सन्मान लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन, येरवडा, पुणे येथे झालेल्या भव्य समारंभात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अब्राहाम आढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहे की, “योगेश करपे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले असून त्यांच्या योगदानातून अनेकांना दिशा व प्रेरणा मिळत आहे.”
या समारंभास सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.योगेश करपे यांच्या या सन्मानामुळे राहुरी तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक कार्यक्षेत्रात अभिमानाची नोंद झाली असून, त्यांच्या या कार्याचा गौरव संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
राहुरीचे सामाजिक कार्यकर्ते योगेश करपे राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्काराने सन्मानित, ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे तर्फे समाजहितासाठी उल्लेखनीय कार्याची दखल

0Share
Leave a reply












