SR 24 NEWS

राजकीय

राहुरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर — स्थानिक राजकारणात नवा पेच, राहुरी पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण — उंबरे, मानोरी, ब्राम्हणी गटात चुरस रंगणार!!

Spread the love

राहुरी वेब प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) – राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटांचे व पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण सोडत काल जाहीर करण्यात आली. राहुरी पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण खुले असल्याने उंबरे, मानोरी व ब्राम्हणी या गटांमध्ये मोठी चुरस पाहवयास मिळाणार आहे.

राहुरी तहसिल कार्यालयात उपजिल्हाधिकारी मनिषा राशिनकर, तहसिलदार नामदेव पाटील यांच्या उपस्थितीत लहान मुलाच्या हस्ते चिठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये ब्राम्हणी व गुहा हे गट (सर्वसाधारण (व्यक्ती), वांबोरी गट (सर्वसाधारण महिला), टाकळीमिया गट (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) तर बारागाव नांदूर गट (अनुसूचित जमाती महिला) असे आरक्षण जाहिर झाले.

पंचायत समितीच्या दहा गणांमध्ये उंबरे, मानोरी व वांबोरी गण (सर्वसाधारण व्यक्ती), कोल्हार खुर्द, ब्राम्हणी व गुहा गण (सर्वसाधारण महिला), टाकळीमिया गण (ना.मा.प्र महिला), सात्रळ गण (ना.मा. प्र. व्यक्ती), बारागाव नांदूर गण (अनुसूचित जमाती महिला), डिग्रस गण (अनुसूचित जाती व्यक्ती) असे आरक्षण जाहिर करण्यात आले.

बारागाव नांदूर गट अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाल्याने माजी जि.प. सदस्य धनराज गाडे व सडे येथील धिरज पानसंबळ यांचा हिरमोड झाला आहे. तसेच या गटातील बारागाव नांदूर व डिग्रस गणही आरक्षित झाल्याने त्यांना नविन गट अथवा गण शोधावा लागेल. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांनी जिल्हा परिषदेसाठी जोरदार तयारी केली होती.

तसेच ब्राम्हणी गट सर्वसाधारण जागेसाठी खुला झाल्याने छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाणचे राजूभाऊ शेटे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेशराव बानकर, माजी जि.प. सदस्य विक्रम तांबे, रासपचे व ओबीसी चेहरा असलेले नानासाहेब जुंधारे, कोंढवडचे माजी सरपंच साहेबराव म्हसे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन म्हसे तर माजी उपसभापती रविद्र आढाव, तांदूळवाडीचे सरपंच विराज धसाळ यांच्या नावांची चर्चा आहे.

वांबोरी गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने माजी जि.प. सदस्या शशिकलाताई पाटील, वांबोरीच्या माजी सरपंच मंदाताई भिटे आदींची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जाते. टाकळीमिया गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्याने अनिता निमसे, सुनिता निमसे, मंगल निमसे, मिनाताई करपे, ज्योती शिंदे, सरपंच लिलाबाई गायकवाड, सुवर्णा करपे यांच्या

नावांची चर्चा आहे. गुहा गट सर्वसाधारण साठी खुला झाल्याने या गटात इच्छकांची संख्या वाढल्याचे दिसते. या गटातून किरण कडू, प्रेरणा मल्टीस्टेटचे सुजित वाबळे, भाजपाचे अमोल भनगडे, बलराज डुक्रे, हंबीर कडू ही नावे आघाडीवर आहेत. राहुरी पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण जागेसाठी खुले असल्याने उंबरे, मानोरी, वांबोरी या गटातील सदस्य सभापती होणार असल्याने सर्वच पक्ष व गटांना मोठी कसरत करावी लागणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!