SR 24 NEWS

राजकीय

सर्व सामान्यांचा ढाण्या वाघ दयानंद काळुंके, आता शहापूर जिल्हा परिषद निवडणूक लढवणारच, शहापूर जिल्हा परिषद मतदार संघाचा कायापालट होणार! 

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद मतदार संघ हा तालुक्यातील लक्षवेधी मतदार संघ म्हणून ओळखला जातो. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हा मतदार संघ ओबीसी महिला आरक्षित होता, तर २०२५ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नुकतीच जि.प. व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीत शहापूर मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, लोककलावंत दयानंद काळुंके यांची शहापूर मतदार संघात जोरदार चर्चा सुरू आहे. दयानंद काळुंके हे १९९३ च्या प्रलयंकारी भूकंपापासून आजपर्यंत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहापूर मतदार संघात काम करत आहेत. शेकडो बचत गटांची निर्मिती करून हजारो महिलांना उद्योग व व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. कलाकार म्हणून महाराष्ट्रीयन लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

पत्रकारीतेतही दयानंद काळुंके यांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेतून स्थानिक जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. १९९३ चा भूकंप असो किंवा २०१९–२० च्या कोरोनाच्या लाटीत, त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले, संकट काळात अभय दिला आणि सावधगिरीचा सल्ला दिला. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव २०१२ मध्ये नंदगाव मतदार संघातील पंचायत समिती निवडणुकीत मिळालेला आहे, जिथे फक्त ४० मतांनी पराभव पत्करावा लागला.

दयानंद काळुंके म्हणतात, “लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो. जनतेने मला काम करण्याची संधी दिली तर शहापूर जिल्हा परिषद मतदार संघाचा कायापालट निश्चितच करेन.” सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे की, उच्च शिक्षित, लोककलावंत आणि नेहमीच मदतीचा हात देणारे दयानंद काळुंके यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर शहापूर मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व मिळू शकेल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!