SR 24 NEWS

सामाजिक

उद्योजक बजरंग गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त कॅम्प, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न, खडकवाडी येथील ग्रामस्थांनी घेतला उपक्रमाचा लाभ

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक अनंत उर्फ बजरंग गागरे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश लंके प्रतिष्ठान व रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून, खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवाडी येथे विशेष सेवा कॅम्प, मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.bया विशेष सेवा कॅम्पमध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, नाव दुरुस्ती, नाव कमी करणे, मतदार नोंदणी, बांधकाम कामगार कार्ड, रेशनकार्ड ऑनलाइन करणे अशा विविध सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या. तर मोफत आरोग्य शिबिरात नागरिकांच्या विविध रोगांचे निदान करून उपचार करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरालाही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमास निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव, सामाजिक कार्यकर्ते बजरंग गागरे, श्रीरंग रोकडे, प्रवीण भन्साळी, डॉ. बाळासाहेब कावरे, राजेंद्र रोकडे, विशाल गागरे, गणेश आग्रे, डॉ. रावसाहेब आग्रे, शिवाजी शिंगोटे, बाबासाहेब सागर, निलेश अग्रे, पंकज स्वामी, प्रदीप ढोकळे, भाऊसाहेब शिंगोटे, आबासाहेब नवले, भागचंद्र हुलावळे, देवराम नवले, सोमनाथ गागरे, संदीप शिंदे, अण्णासाहेब गागरे, शाहीर बोबडे, पांडुरंग गागरे, गणेश गागरे, रवींद्र गागरे, संजय इघे, जनार्धन बोबडे, अशोक बर्डे, विलास गायकवाड, भास्कर बर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बजरंग गागरे मित्र मंडळाने या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. खासदार निलेश लंके यांनी उपक्रमाचे कौतुक करत ग्रामस्थांच्या कल्याणासाठी अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याचे आवाहन केले. या सामाजिक उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!