तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त जवाहर महाविद्यालय अणदूर येथे अनिसच्या विवेक वाहिनीचे बीडच्या प्राचार्य डॉ. सविताताई शेटे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी , उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम, अनिसचे कार्यकर्ते विजय घेवारे, कार्यक्रमाधिकारी डॉ. सूर्यकांत आगलावे, डॉ. दयानंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून विवेक वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले.
विवेक वाहिनीची कार्यकारणी स्थापित करण्यात आली. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सविता शेटे म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयाची कणा आहे. विद्यार्थी घडण्याचे एकमेव केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी विवेकी विचाराच्या सानिध्यात रहावे.विवेकहीन वर्तनामुळे समाजाचे नुकसान होते विवेकी विचारांचे आधारे स्वतःमध्ये, समाजामध्ये परिवर्तन घडवणारे संघटन म्हणजे विवेक वाहिनी आहे. आपण सारे बदलू या, परिसर बदलवू या, तरुणांना सक्षम होण्यासाठी विवेकाची वैज्ञानिक दृष्टिकोनाची कृतीशील होण्यासाठी निर्भयतेची आवश्यकता असते. विवेकी विचार वैज्ञानिक दृष्टिकोन युवकांमध्ये रुजवणे जाणीवपूर्वक करावे लागते. पालकांना जागरूक करणे गरजेचे आहे. चार्वाक , म.बुद्ध , म.कबीर इत्यादी महान नेत्यांनी विवेकी विचार केला आहे म्हणून आज समाज त्यांच्या समोर नतमस्तक होतो. एनएसएस दिनानिमित्त व्यसनमुक्तीचे शपथ घेण्यात आली.
स्वयंसेवकांना डायरी व बिले वाटप करण्यात आले. अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, प्रास्ताविक डॉ. सूर्यकांत आगलावे सूत्रसंचालन डॉ. मल्लिनाथ बिराजदार सूत्रसंचालन डॉ. मल्लिनाथ बिराजदार आभार डॉ.दयानंद कांबळे यांनी मानले. डॉ. सुधाकर सांगळे ,डॉ. अमोल पाचपिंडे, डॉ. मारुती मुसांडे, डॉ.फुलचंद दूधभाते, डॉ. मानसी स्वामी, प्रा. शैलेश शेवाले, शुभांगी स्वामी, महादेव काकडे, संतोष चौधरी, नामदेव काळे, आदोबा हालुंगडे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply













