राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) :राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ३५ विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहनांवर मिळून ₹१८,५०० दंड आकारण्यात आला असून संबंधित मालकांना ताब्यात घेऊन वाहनांवर पुन्हा नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या. गेल्या काही दिवसांत चोरीच्या गाड्या अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली.
राहुरी पोलिसांनी सर्व वाहनधारकांना आवाहन केले आहे की, आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट लावाव्यात. यामुळे अनावश्यक दंड टळेल तसेच चोरीचे वाहन शोधणे सोपे जाईल. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे (राहुरी पोलीस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पो.स.ई. सप्तर्षी, फौजदार भाऊसाहेब आव्हाड, पो.हे.काँ. फुलमळी तसेच होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते.
नवीन वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आणली जात असल्याने संबंधित शोरूम चालकांविरुद्ध आरटीओमार्फत कारवाई करण्यासाठी पत्र पाठविण्यात येणार आहे. अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई तसेच, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, अन्यथा कायदेशीर कडक कारवाई पालकांवर करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
राहुरी पोलिसांची विशेष मोहिमेदरम्यान ३५ विना नंबर प्लेट दुचाकीवर वाहनांवर दंडात्मक कारवाई

0Share
Leave a reply












