राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) राहुरी नर्सिंग होम ट्रस्टच्या धन्वंतरी कामगार व रुग्णालय पतसंस्था मर्या. रा.फॅक्टरी च्या संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे उपाअध्यक्ष भारत नानासाहेब वारुळे हे होते. पुढे बोलतांना वारुळे म्हणाले कि, कामगार पतसंस्थेच्या सभासदांना अगदी कमी कागदपत्रांवर त्वरित कर्ज उपलब्ध होत असते, त्या सभासदांना फायदा होतो, पतसंस्थेने सभासदांनांच्या मुला/मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजना, सभासदांसाठी आरोग्य विमा संरक्षण या सारख्या योजना लागू करण्यात संदर्भीत विचार करावा.
यावेळी सेवा निवृत्त सभासदांचा सन्मान तसेच सभासदांच्या १० वी/१२ वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा उपस्थितांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.सभेचे अध्यक्ष वारूळे यांनी पतसंस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करत नविन उपक्रम सुरू करण्यात बाबत मार्गदर्शन केले.पतसंस्थेचे चेअरमन गजानन वराळे यांनी श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे अध्यक्ष अरुणसाहेब तनपुरे यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती दिली व सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात आहे असे जाहीर केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद डॉ.कड सर, डॉ.बांगर सर यांनी मार्गदर्शन केले. सभासदांनी चर्चेत सहभाग नोंदविला.
सदर सभेस जेष्ठ संचालिका डॉ.चेतना कुलकर्णी, व्हाइस चेअरमन विजय डुकरे संचालक प्रा.निलेश जाधव, डॉ.शेकोकार, दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय हिवाळे, ज्ञानेश्वर माऊली टिक्कल,विमल गायकवाड,शोभा ठुबे, सेक्रेटरी डी.जी.बोरडे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नागरगोजे सर, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य गागरे सर उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ धोंडे सर यांनी केले. आभार आयुर्वेदिक महाविद्यालयांचे उपप्राचार्य डॉ बागर सर यांनी मानले. यावेळी संस्थेचे मा.चेअरमन भगवानराव म्हसे यांचे सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply













