नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : देशातील १४० कोटी जनतेला आर्थिक दृष्ट्या मोठा दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये ऐतिहासिक कपात केली आहे. आरोग्यसेवा पूर्णतः जीएसटीमुक्त करण्यात आली असून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील कर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदीसाठी आता अधिक संधी उपलब्ध झाली असून याबद्दल जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेड शहरातील व्यापारी व उद्योजकांच्या प्रतिष्ठानांना भेटी देऊन संवाद साधला. या वेळी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.खा. डॉ. गोपछडे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन आपली ताकद त्यांच्या पाठीशी उभी करावी.”
जीएसटी टू पॉईंट झिरो या नव्या करप्रणालीत आता फक्त दोन करदर लागू असतील. दैनंदिन आवश्यक वस्तूंवर ५ टक्के आणि इतर वस्तूंवर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. रोटी, पराठा, मूलभूत औषधे यांसह आरोग्य विमा व जीवन विमा संपूर्णपणे करमुक्त झाले आहेत. त्यामुळे किराणा खरेदी किंवा औषधोपचारांवरील खर्चात थेट बचत होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. गंभीर आजारांवरील उपचारांच्या खर्चातही मोठी कपात होईल.
“पारदर्शी नियमावली आणि जनतेच्या गरजांवर भर देणारी ही कर प्रणाली नागरिकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेत वाढ करून देशाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करेल,” असेही डॉ. गोपछडे यांनी सांगितले. या निर्णयामुळे १४० कोटी भारतीयांना दिलासा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या वेळी मारोतराव कवळे गुरुजी, दीपक कोठारी, डॉ. माधवराव काहाळेकर, दीपक ठाकूर, प्रवीण तोष्णीवाल, समीर तम्मेवार, दीपकसिंघ रावत, श्रीहरी लोनाळकर, सुभाष माटलवार, खुशालराव पाटील गोरशेट्टे, लक्ष्मणदादा क्षीरसागर, मुकेश शर्मा, रवि रुद्रवार, अमोल देशमुख, दिनेश पाटील मोरताळे, लक्ष्मीकांत लोकमानवार, सदानंद मेढेवार, बजरंग संगणवार, धीरज तोष्णीवाल, प्रणव मन्नुरवार, हनुमंत सक्करवार, नागनाथ स्वामी, अमित शर्मा आदी मान्यवर व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जीएसटी कपातीनंतर खा. डॉ. अजित गोपछडे यांचा व्यापाऱ्यांसोबत आनंदोत्सव : मिठाई वाटून मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

0Share
Leave a reply












