राहुरी (प्रतिनिधी) / ज्ञानेश्वर सुरशे : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे संघर्षयोद्धा दिपक बोर्हाडे आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आज राहुरी तालुक्यातील धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राहुरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात धनगर समाजाचा मुद्दा मांडताना समितीने म्हटले आहे की, महाराष्ट्रात धनगड (Dhangad) नावाची जमात कधीच अस्तित्वात नव्हती. सन १९३१ पर्यंतच्या जनगणना, जिल्हा गॅझेटियर तसेच राज्य पुनर्गठनानंतरच्या कोणत्याही दस्तऐवजात धनगडचा उल्लेख नाही. महाराष्ट्र सरकारने देखील मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा शपथपत्र देऊन धनगड अस्तित्वात नसल्याचे व धनगर समाज अस्तित्वात असल्याचे स्पष्ट मान्य केले आहे. तरीदेखील न्यायालयीन प्रक्रियेत खिल्लारे कुटुंबाच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे धनगर समाजाला न्याय नाकारण्यात आला.
निवेदनात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने बी. बासवलिंगप्पा विरुद्ध डी. मुनिचिन्नप्पा प्रकरणात दिलेल्या निकालानुसार न्यायालयाला खऱ्या हकदार समाजाचा शोध घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तात्काळ निर्णय घ्यावा.
तसेच राज्य सरकार व केंद्र सरकारने राष्ट्रपतींकडून अनुसूचित जमातींच्या यादितील क्रमांक ३६ वर धनगडच्या जागी धनगर वाचावे असा गॅझेट आदेश तातडीने काढावा, अशी मागणी समितीने केली आहे.
यासोबतच समितीने इशारा दिला आहे की, जर धनगर समाजाला तातडीने एसटी प्रवर्गात आरक्षणाची अंमलबजावणी करून दिली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन-प्रशासनावर राहील.
निवेदन देताना यावेळी गंगाधर पाटील तमनर, विजय तमनर, सर्जेराव लाटे, प्रदीप विटनोर, गोविंद तमनर, वैभव तमनर, दिलीप खडके, दत्तात्रय बाचकर, संजय वडीतके, भाऊसाहेब माळी, कृष्णा कोरडे, साहेबराव पिसाळ, बाळासाहेब विटनोर, रामदास बाचकर, नानासाहेब जुंधारे, प्रमोद तोडमल, श्रीकांत बाचकर, आप्पासाहेब तमनर, भारत मतकर, गणेश तमनर, दिलीप सरोदे, किशोर तमनर, विलास भुसारे, सुदाम कैतके, विजय कैतके, ज्ञानदेव कैतके, विठ्ठल रोडे, डोलनर अनिल, दत्तात्रय खेडेकर, भारत विटनोर, ज्ञानेश्वर बाचकर, विठ्ठल तमनर, राहुल बाचकर, वसंत पाटोळे, विठ्ठल धवन, ॲड. भक्ती तमनर, सौरभ बन्सी तमनर, किरण बन्सी तमनर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुरी येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन – तात्काळ ST आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

0Share
Leave a reply













