SR 24 NEWS

सामाजिक

एस.टी. आरक्षणासाठी धनगर आंदोलनाचे रणशिंग ; शिर्डीत ११ रोजी महत्त्वपूर्ण बैठक— उपोषणकर्ते विजय तमनर यांची माहिती

Spread the love

शिर्डी प्रतिनिधी : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून धनगर जमातीसाठी एस.टी. आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न प्रलंबित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनादत्त आरक्षण दिले असताना प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने धनगर समाजात तीव्र असंतोष आहे.या पार्श्वभूमीवर एस.टी. आरक्षणासाठी निर्णायक आंदोलनाची तयारी म्हणून दि. ११ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिर्डीत ‘धनगर जमातीचा एस.टी. आरक्षण मुक्तिसंग्राम’ बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती उपोषणकर्ते विजय तमनर यांनी दिली.

या बैठकीसाठी धनगर समाजातील सातत्याने संघर्ष करणारे मल्हारयोद्धे दीपकभाऊ बोऱ्हाडे, तसेच राज्यभरातील उपोषणकर्ते, आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते, नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि धनगर समाजाचे विविध प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत मुंबईतील आझाद मैदान येथे होणाऱ्या ऐतिहासिक धनगर आरक्षण मुक्तिसंग्राम लढ्याची संपूर्ण तयारी, आंदोलनाची दिशा व पुढील टप्प्यांवरील कृती आराखडा यावर सविस्तर चर्चा होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!