SR 24 NEWS

क्राईम

अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या आरोपीस राहुरी पोलिसांनी वांबोरी येथून घेतले ताब्यात, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून गंगापूर पोलीस स्टेशनच्या दिले ताब्यात

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : अहिल्यानगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले असतानाही कायद्याचे उल्लंघन करून जिल्हा हद्दीत वावरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना राहुरी पोलिसांनी  वांबोरी येथून रविवारी (दि. ८ फेब्रुवारी २०२६) रोजी कारवाई करून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्यांना गंगापूर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे संदीप दिलीप चेंडवाल (वय ३९) व प्रसाद उर्फ सोन्या बाबासाहेब चेंडवाल (वय २७, दोघेही रा. गुंजाळे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) अशी आहेत. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार सदर आरोपींना दिनांक १८ डिसेंबर २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. हा आदेश २२ नोव्हेंबर २०२५ पासून लागू करण्यात आला होता.

मात्र, तडीपार आदेशाचे उल्लंघन करून हे दोन्ही आरोपी जिल्हा हद्दीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने वांबोरी परिसरात शोधमोहीम राबवली. रविवारी सकाळी दिनांक ०८/०२/२०२६ रोजी वांबोरी येथे दोघेही मिळून आल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या प्रकरणी पोलीस नाईक सुनील भानुदास निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२८/२०२६ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हद्दपार आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही आरोपींना गंगापूर पोलीस स्टेशन, जि. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!