SR 24 NEWS

क्राईम

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याकरिता लॉज उपलब्ध करून दिल्या प्रकरणी हॉटेल मालकास अटक

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी पोलीस स्टेशन गुरण 917/25 कलम 64(1) Bns सह 4,8,12 पोस्को मध्ये अनिकेत लॉजिग मालक चालक अनिकेत जाधव वय 27 वर्ष रा शिगवे नाईक याने यातील आरोपी हा पीडित मुलीस लॉज वर घेऊन गेल्यानंतर सदर इसमाने पीडित हिचे वयाची कोणतेही कागदपत्रे पाहणी ना करता रूम उपलब्ध करून दिल्याने कलम 55 Bns सह कलम 17 पोस्को वाढ करून अटक करून त्यास मान्य न्यायालयापुढे पोलीस कस्टडी रिमांड करिता हजर केले असे मान्य न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कस्टडी दिली आहे.

तरी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व हॉटेल मालक लॉज चालक यांना राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपणाकडे कुणीही ग्राहक आल्यास त्याचे ओळखपत्र जन्माचा पुरावा घेऊन त्यावर संबंधिताची स्वाक्षरी घेऊन रजिस्टर ला नोंद घ्यावी .तसेच कोणत्याही परिस्थितीत अल्पवयीन मुलीसह आलेल्या ग्राहकास हॉटेलमध्ये लॉज मध्ये रूम उपलब्ध करून देऊ नये .

अशाप्रकारे अल्पवयीन मुलीस रूम उपलब्ध करून दिल्यास व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडल्यास भारतीय न्याय संहिता कलम 55 तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम 17 अन्वये हॉटेल /लॉज मालक चालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ व लेखनिक पोलीस हवालदार सतीश आवारे,पोहवा विस्वास बेरड, पोना अशोक कुदळे ,पोशी रवी पवार यांनी केली आहे .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!