राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : गरुड फाउंडेशन व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कारांचे आयोजन जुलै महिन्यात करण्यात आले होते. हा कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ७ जून रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, त्या दिवशी काही मान्यवर व्यस्त असल्याने ते मुख्य सोहळ्यात सहभागी होऊ शकले नव्हते.
याच पार्श्वभूमीवर राहुरी पोलीस स्टेशनचे चार कर्तव्यदक्ष अधिकारी व एका पत्रकाराचा सन्मान विशेष कार्यक्रमाद्वारे करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी राहुरी येथे झालेल्या या कार्यक्रमात पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक शिंदे, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ पाखरे, पोलीस कर्मचारी जालिंदर धायगुडे यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच राहुरी तालुक्यातील युवा व पत्रकारिता क्षेत्रात नावाजलेले पत्रकार गोविंद फुणगे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी गरुड फाउंडेशनचे कार्याध्यक्ष रमेश खेमनर, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव राजेंद्र म्हसे, जिल्हा संघटक सचिव ज्येष्ठ पत्रकार आर. आर. जाधव, सी न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार शरद पाचारणे, तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, तालुका सचिव सोमनाथ वाघ, संघटक जावेद शेख सह आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मानित मान्यवरांना पुरस्कार स्वरूपात सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. राहुरी पोलीस स्टेशनच्या कामकाजात सातत्याने प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा झालेला सन्मान उल्लेखनीय ठरला असून स्थानिक स्तरावर या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
राहुरी पोलीस स्टेशनच्या चार पोलीसांना प्रशासकीय सेवा पुरस्कार, पत्रकार गोविंद फुणगे आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

0Share
Leave a reply













