SR 24 NEWS

क्राईम

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: कोट्यवधींचा सुगंधी तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त

Spread the love

राहुरी (जावेद शेख) : अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने राहुरी पोलीस ठाणे हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर एक मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ ट्रक तंबाखू आणि १२ ट्रक सुगंधी सुपारी असा एकूण १३ ट्रक माल पकडला असल्याचे समजते.मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व ट्रक बेंगळूरू येथून अहमदाबादकडे जात होते. कोल्हार खुर्द येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

 इतक्या मोठ्या प्रमाणावर सुगंधी सुपारी आणि तंबाखू जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी.vसदर ट्रक सध्या राहुरी पोलीस ठाण्यात आणले असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 

या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार रमेश गांगुर्डे, हवालदार राहुल द्वारके, पोलीस नाईक गायकवाड, भीमराज खरसे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील माळणकर, राहुल डोके, पोलीस हवालदार गणेश लबडे, सतीश भवर, संतोष खैरे व अमृत आढाव यांचा समावेश होता.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!