संगमनेर प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. संगमनेरमध्ये शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या जीवघेणा हल्ला झाला आहे. संगमनेर फेस्टिवलच्या कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. आमदार अनोल खताळ हे संगमनेरमध्ये ‘संगमनेर फेस्टिवल’च्या उद्घाटनाला आले होते.
‘संगमनेर फेस्टिवल’च्या उद्घाटनाला आले असताना शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. कार्यक्रमामध्येच एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते आहे. आमदार अमोल खताळ यांना हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आलेल्या तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
आमदार अमोल खताळ यांच्या एका तरुणाने हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला त्याने का केला याचे कारण द्याप समोर येऊ शकलेले नाही. मात्र या घटनेने संगमनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कार्यक्रमस्थळी शिवसेना आमदार अमोल खताळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. या घटनेमुळे संगमनेरमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. पोलिसानी बंदोबस्त वाढवला आहे.
दरम्यान या हल्ल्याचा राधाकृष्ण विखे पाटलांकडून निषेध करण्यात आला आहे, या भ्याड हल्ल्याचा निषेध, हल्लेखोर कुणाचे पुरस्कृत आहेत? यासंदर्भात पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत, भ्याड हल्ले करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असा काहींचा गैरसमज आहे, हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही, दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. काही लोकांनी लोकशाहीचा कौल मान्य केला पाहिजे, त्यांना लोकशाही मान्य नसेल आणि ठोकशाही मान्य असेल तर संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
Leave a reply














