तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 67 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8:30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. चनशेट्टी म्हणाले की, “विद्यापीठ हे परिवर्तनाचे केंद्र आहे. तरुणाईला योग्य दिशा देण्याचे कार्य विद्यापीठाच्या माध्यमातून होत असते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. बाबासाहेबांचे श्रम, आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनात यश संपादन करावे असे आवाहन केले. “राष्ट्रबांधणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply














