राहुरी (प्रतिनिधी) / ज्ञानेश्वर सुरशे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यापूर्वी प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यास आलेल्या हरकतींचा विचार करून नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अंतिम मान्यता दिली असून, या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.
अंतिम रचनेनुसार राहुरी तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गणांचा समावेश आहे. त्यात टाकळीमिया गटात टाकळीमिया गण व कोल्हार खुर्द गण, ब्राम्हणी गटात मानोरी गण व ब्राम्हणी गण, गुहा गटात सात्रळ गण व गुहा गण, बारागाव नांदूर गटात डिग्रस गण व बारागाव नांदूर गण, तसेच वांबोरी गटात उंबरे गण व वांबोरी गण यांचा समावेश आहे.
दि. १४ जुलै रोजी प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्यानंतर काल दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम प्रभाग रचना निश्चित करण्यात आली.
या निर्णयामुळे राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी लवकरच रंगणार असून, राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Leave a reply













