SR 24 NEWS

जनरल

स्वच्छता जीवनातील अविभाज्य भाग: स्वच्छतादूत आजीबाळ गायकवाड

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे :स्वच्छता ही आपल्या जीवनातील अविभाज्य भाग असून केवळ अपेक्षा ठेवून काम न करता निस्वार्थ भावनेने केलेले काम ईश्वरा समान असल्याची भावना अणदूरचे सुपरिचित स्वच्छता दूत आजीबाळ गायकवाड यांनी व्यक्त केले.

आजीबाळ गायकवाड यांच्या 71 व्या जन्मदिनानिमित्त बसस्थानकात वाहतूक नियंत्रक राजेंद्र चव्हाण, 8 फार्मा ग्रुपचे गुणवंत मुळे, जय मल्हार पत्रकार संघाचे चंद्रकांत हगलगुंडे, रिक्षा संघाचे सोमनाथ बेंद्रे, उडपी उपग्रहाचे विश्वनाथ शेट्टी यांच्या हस्ते शाल ,फेटा, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना 8 फार्माचे गुणवंत मुळे म्हणाले की, आजीबाळांचे स्वच्छतेचे काम खरोखरच आदर्श असून अजिबाळामुळे अणदूरचे बसस्थानक स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे सांगून समाजात निस्वार्थपणे स्वच्छतेचे काम करणाऱ्या स्वच्छता दूतांचा सन्मान झाल्यास त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रेरणा व समाधान मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी सुरेश तोडकरी, महाळप्पा गळाकाटे, आयुब आत्तार, बाबा तांबोळी, छोटू घुगे, खंडोबा व्हणाळे, मारुती सोनटक्के, अजित शेख, शिवाजी पापडे, ऋषी कांबळे, नजीर शेख, शिवा गायकवाड, अनिल कबाडे, सुनील गायकवाड, अजित वचने, आकाश आळंगे, मारुती बों गरगे, प्रशांत मुळे, बाळू वाघे, रमेश कांबळे सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!